ज्येष्ठांसाठी कल्याणकारी योजना
सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन
सिंगल सिनियर्ससाठी सुरक्षा, आरोग्य आणि पुन्हा जोडीदार मिळवून देऊन जमल्यास सेकण्ड इनिंग चालू करण्यास प्रोत्साहन. देशात किंवा परदेशात असलेल्या एकक भारतीयांना आपले उर्वरित आयुष्य आनंदात घालविण्यासाठी सर्व मदत उपलब्ध आहे.
डे केअर सेंटर्स
ज्येष्ठांसाठी डे केअर सेंटर्स आणि अन्य मुक्कामासाठी वसतीगृहे, घरगुती रहाण्याची व्यवस्था, पुनर्वसन केंद्रे, समूपदेशन केंद्रे इत्यादींचा समावेश. विशेषतः स्त्रिया, मुले व वृद्ध ज्यांना मदतीची अत्यंत गरज आहे, अशांना मदत करणे किंवा मिळवून देणे.
वंचित ज्येष्ठांची काळजी
वंचित वा दुर्लक्षित ज्येष्ठांसाठी अन्न, वस्त्र, औषधे, पुस्तके, स्वच्छता आणि आरोग्यसेवा पुरविणे.
उत्पन्न साधन निर्माण
ज्या ज्येष्ठांना पेन्शन नाही, वाडवडीलार्जीत घरदार, शेतीवाडी नाहीत, मुलं विचारत नाहीत किंवा सांभाळू शकत नाहीत, अशा लोकांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून देणे.
शैक्षणिक संस्था
शैक्षणिक संस्था निर्माण करणे ज्या योगे ज्येष्ठ, परित्यकत्या महिलांना रोजगाराभिमुख शिक्षण देता येईल. त्यायोगे त्यांचे पुनर्वसन करता येईल. मुल, महिला, ज्येष्ठ यांच्या मदतीसाठी समुपदेशक तयार करण्यासाठी संस्था स्थापन करून, शिक्षित व अनुभवी कौन्सिलर्स महाराष्ट्रभर निर्माण करणे.
होमस्टे योजना
खेडेगावातून होमस्टेची योजना कार्यान्वित करून, तेथील ज्येष्ठ, महिला, स्थानिक कलाकार, तसेच स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळून देण्यास मदत करणे.
नवीन योजना
या व्यतिरीक्त, अनेक योग्य व्यक्तींच्या कल्पना व मार्गदर्शन यांचा मिलाफ घडवून समाजोपयोगी नवनवीन योजना कार्यान्वित करणे.
Our Activities
Our foundation focuses on various activities that include:
- Happy Seniors, Wanprasthasdhram, Wai.
- Shri Swami Samarth Shaktipith, Wai.
- Women Empowerment
- Child Development
Our goals include improving the quality of life for marginalized communities and
creating sustainable solutions that empower individuals to thrive.